Vivo X200 FE फोन भारतात कधी लॉन्च होणार: आजकल भारतीय बाजारात नवीन टेक्नॉलजीसह अनेक चांगले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. यामध्ये Vivo कंपनीचा नवीन स्मार्टफोन Vivo X200 FE भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही Vivo X200 FE या स्मार्टफोनविषयी अधिक माहिती शोधत असाल, तर हा लेख मुख्यता तुमच्यासाठीच आहे. आजच्या या लेखामधून आपण या फोनविषयी संपूर्ण माहिती मिळवू.
Vivo X200 FE फोन भारतात कधी लॉन्च होणार
Vivo X200 FE हा फोन भारतात 12 जून रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने याबद्दल काही स्पष्ट माहिती दिलेली नाहीये पण काही न्यूज आणी रीपोर्टनुसार आपण हा फोन जून महिन्यात लॉन्च होऊ शकतो असा अंदाजा नक्की लाऊ शकतो. काही दिवसातच विवो कंपनी लॉन्च तारीख जाहीर करेन तेव्हा ब्लॉगमध्ये मी लगेचच तुम्हाला अपडेट कवेन.
Vivo X200 FE फोनची भारतात किंमत किती आहे
विवो कंपनीने X200 FE या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत काही खुलासा केलेला नाहीये. पण काही रीपोर्टनुसार आणी न्यूजनुसार या फोनची किंमत ₹48,990 पासून सुरू होऊ शकते. या फोनमध्ये आपल्याला मुख्य 2 वेरिएंट मिळणार आहे त्यामध्ये 8GB RAM आणी 128GB स्टोरेज तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज. Vivo X200 FE या फोनची चीनमध्ये सुमारे ₹56,000 किंमत आहे.
Vivo X200 FE Feature in Details
फीचर | डिटेल्स |
---|---|
डिस्प्ले | 6.31 इंच LTPO OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट |
प्रोसेसर | MediaTek Dimensity 9400e, 3nm प्रोसेसर |
कॅमेरा (मुख्य) | 50MP मुख्य कॅमेरा, 50MP टेलीफोटो कॅमेरा |
फ्रंट कॅमेरा | 50MP |
बैटरी | 5800mAh, 90W फास्ट चार्जिंग |
ऑपरेटिंग सिस्टम | Android 13, Funtouch OS |
5G सपोर्ट | हो |
रॅम आणि स्टोरेज | 8GB/12GB RAM, 128GB/256GB स्टोरेज |
डिझाइन | स्लीक आणि प्रिमियम, हलके वजन |
सुरक्षा | इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक |
आवाज | डॉल्बी अॅटमॉस साउंड सपोर्ट |
IP रेटिंग | IP53 रेटिंग |
Also Read This – Vivo X200 Ultra भारतात कधी होणार आहे लॉन्च संपूर्ण माहिती मराठीमध्ये
Vivo X200 FE Display in Marathi
Vivo X200 FE मध्ये आपल्याला 6.31 इंचाची LTPO OLED डिस्प्ले दिला जाईल, त्यामुळे आपल्याला डिस्प्ले वरील कलर खूपच सुंदर आणी स्पष्ट दिसणार आहेत. या डिस्प्लेमध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz चा रिफ्रेश रेट असणार आहे, त्यामुळे आपण गेम किंवा स्क्रीन स्कोल करताना आपल्याला स्कीनवरील टच स्मूथ वाटनार आहे.
Vivo X200 FE Camera in Marathi
Vivo X200 FE मध्ये ड्युल कॅमेरा सेटअप दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मुख्यता 50MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तर दूसरा 50MP टेलीफोटो कॅमेरा असणार आहे. हा कॅमेरा फोनच्या किंमातीच्या तुलनेत खूपच चांगला आहे, प्रायमरी कॅमेरा हा फोटो आणि व्हिडिओसाठी उताम आहे तर टेलीफोटो कॅमेरा जवळून फोटो काढण्यासाठी आधिक चांगला आहे. फ्रंट कॅमेरामध्ये पण 50MP चा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
Vivo X200 FE Battery in Marathi
Vivo X200 FE मध्ये 5800mAh ची Li-ion बॅटरी वापरण्यात आलेली आहे. तुम्हाला खूप जणांना माहिती असेल की Li-ion या बॅटरीची ओळख ही दीर्घकाळ टिकाऊपणा आणि सुरक्षितता या दोन घटकांवरती अवलंबून आहे. बॅटरीला चार्ज करण्यासाठी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, त्यामुळे कमी वेळात बॅटरी फास्ट चार्ज होणार आहे.
Vivo X200 FE Processor in Marathi
Vivo X200 FE मध्ये MediaTek Dimensity 9400e प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. हा प्रोसेसर 3nm टेक्नॉलजीवरती आधारित आहे, त्यामुळे स्मार्टफोन खूप फास्ट काम करतो. हा प्रोसेसर गेमिंग, मल्टीटास्किंग आणि इतर जास्त लोड असलेल्या अॅप्ससाठी चांगला आहे.
FAQ’s
Vivo X200 FE मध्ये 5G सपोर्ट आहे का?
हो, Vivo X200 FE मध्ये 5G नेटवर्क सपोर्ट आहे. यामुळे आपण खूपच फास्ट इंटरनेटचा अनुभव घेऊ शकतो. गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, आणि डेटा डाउनलोड करत असताना याचा आपल्याला खूप उपयोग होतो.
Vivo X200 FE मध्ये कोणते सुरक्षा फीचर्स आहेत ?
Vivo X200 FE मध्ये आपल्याला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक आशे काही आधुनिक सुरक्षा फीचर्स दिलेले आहे.
Vivo X200 FE मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टिम आहे ?
Vivo X200 FE मध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेली आहे, जी Funtouch OS वरती काम करते. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्याला अनेक सुधारणा आणि नवीन फिचर्स देण्यात आलेले आहे.
Conclusion
वरती या लेखामधून घेतलेल्या माहितीनुसार Vivo X200 FE हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. 50MP कॅमेरा, 120Hz डिस्प्ले, आणि 90W फास्ट चार्जिंग अश्या काही फीचर्समुळे हा फोन आपल्याला प्रीमियम फिल देणार आहे. हा फोन खासकरून कमी किंमतीमध्ये जास्त फीचर्स हवे आहे यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.