आजच्या या डिजिटल काळामध्ये प्रत्येकला परवडणारा पण त्याचसोबत खतरनाक फीचर्स असणारा स्मार्टफोन हवा आहे. Vivo T4x 5Gहा स्मार्टफोन भारतीय बाजारात आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाचा उत्साह वाढलेला आहे. कमी किंमतीमध्ये 5G सपोर्ट, भरपूर मोठी बॅटरी आणी चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा हा स्मार्टफोन तुम्हाला नक्की आवडणार आहे. या लेखामध्ये आपण फोनची किंमत आणी हा फोन खरच परवडणार आहे का याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणार आहे.
Vivo T4x 5G हा स्मार्टफोन परवडणार आहे का
Vivo T4x 5G स्मार्टफोन आपल्याला कमी किंमतीमध्ये 5G नेटवर्कचा अनुभव देणार आहे, त्याशिवाय फोनमध्ये चांगली बॅटरी, जोरात फास्ट चार्जिंग आणी डोळ्यांना लाजवेन अशी डिझाईन मिळणार आहे. जा स्मार्टफोन 3 ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, 6GB RAM + 128GB स्टोरेज – ₹13,999, 8GB RAM + 128GB स्टोरेज – ₹14,999 आणी 8GB RAM + 256GB स्टोरेज – ₹16,999. ईतक्या कमी किंमतीमध्ये हा फोन उपलब्ध आहे आपण नक्कीच म्हणू शकतो की Vivo T4x 5G हा स्मार्टफोन परवडणार आहे.
Vivo T4x 5G फोन कधी मार्केटमध्ये आला आहे
Vivo T4x 5G फोन भारतीय मार्केटमध्ये 5 मार्च 2025 रोजी आलेला आहे. कमी किंमतीमध्ये 5G अनुभव देणारा हा स्मार्टफोन खरचच परवडणारा आहे, या फोनमध्ये चांगली बॅटरी, खूपच फास्ट प्रोसेसर मिळणार आहे. खाली आपण या लेखामध्ये एक एक करून सर्व फीचरबद्दल माहिती मिळवणार आहे.
Vivo T4x 5G Features in Marathi
Feature | Description |
---|---|
Display | 6.72-inch Full HD+ IPS LCD, 120Hz refresh rate |
Processor | MediaTek Dimensity 7300 (4nm) Octa-core, up to 2.5 GHz |
RAM | 8GB RAM |
Storage | 128GB internal storage, expandable via microSD card |
Battery | 6500mAh with 44W FlashCharge fast charging support |
Rear Camera | 50MP AI primary camera, 2MP depth sensor, 4K video recording, LED Flash |
Front Camera | 8MP selfie camera, 1080p video recording |
Operating System | Android 14 with Funtouch OS |
5G Support | Yes, supports 5G networks |
Fingerprint Sensor | Side-mounted fingerprint sensor |
Face Unlock | Yes, supports face unlock |
Other Features | Dual SIM support, USB Type-C, 3.5mm headphone jack, Night mode, Portrait mode |
More Like This – Samsung Galaxy Z Flip 7 ची लॉन्च तारीख किती आहे
Vivo T4x 5G Display
Vivo T4x 5G फोनमध्ये आपल्याला 6.72 इंचाचा मोठा IPS LCD डिस्प्ले पाहायला मिळणार आहे, हा डिस्प्ले आपल्याला Full HD+ रिझोल्यूशन (2408 x 1080 पिक्सेल) मध्ये भेटणार आहे. यामध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट आहे, त्यामुळे स्क्रोल करत आसताना किंवा एका सोबत जास्त Apk वापरत आसताना स्क्रीन एकदम स्मूथ वाटणार आहे.
Vivo T4x 5G Battery
Vivo T4x 5G या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी दिलेली आहे, ही बॅटरी खूप जास्त वेळ टिकणार आहे. या बॅटरीसह 44W FlashCharge चार्जर दिलेला आहे, हा चार्जर खूपच फास्ट आहे कंपनीने सांगितले आहे की या चार्जरच्या मदतीने आपण 10 ते 15 मिनिटमध्ये मोबाइल फुल चार्ज करू शकतो.
Vivo T4x 5G Camera
Vivo T4x 5G या फोनचा कॅमेरा सेटअप फोटोग्राफीसाठी खूपच चांगला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 50MP चा आहे, या कॅमेरामुळे फोटोज खूपच स्पष्टप्रकारे आपल्याला दिसतात. त्यासोबतच 2MP डेप्थ कॅमेरा आपल्याला मिळणार आहे, या कॅमेरामुळे पोर्ट्रेट फोटोंमध्ये खूपच डीटेल कॅप्चर होतात. सेल्फी कॅमेराबद्दल सांगायच झाल तर 8MP चा सेल्फी कॅमेरा आपल्याला मिळणार आहे.
Vivo T4x 5G Processor
Vivo T4x 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे, हा फोन पूर्णपने 4nmवरती आधारित आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.5 GHz पर्यंत क्लॉक स्पीडसह येतो, यामुळे फोनच स्पीड खूपच वेगवान आहे. या प्रोसेसरमुळे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि Apk वापरण्यात खूपच मज्जा येते.
FAQ’s
Vivo T4x 5G हिट होतो का ( Heating issue ) आहे का ?
जर तुम्ही फोनमध्ये रोजच्या वापराचे Apk आणी मिड-लेव्हल गेमिंग केली तर विशेष काही heating issue होणार नाहीये. या फोनमध्ये Dimensity 7300 प्रोसेसर खूप पावर एफिशियंट आहे आणि 4nm टेक्नॉलॉजीमुळे फोन थंड राहतो.
Vivo T4x 5G मध्ये एक्सपांडेबल स्टोरेज आहे का ?
हो, Vivo T4x 5G मध्ये आपण microSD कार्डद्वारे स्टोरेज वाढवू शकतो. जर आपल्याला जास्त फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स जपून ठेवायच्या असतील तर ते शक्य आहे.
Vivo T4x 5G फोन वॉटरप्रूफ आहे का ?
नाही, Vivo T4x 5G मध्ये कोणतंही IP रेटिंग दिलेली नाहीये. त्यामुळे हा फोन पूर्णपणे वॉटरप्रूफ नाहीये, पण थोडफार पाणी फोनमध्ये गेल तरी फोन सुरक्षित राहणार आहे.
Conclusion
Vivo T4x 5G हा स्मार्टफोन त्याच्या किंमतीच्या मानाने खूपच चांगले फीचर्स आपल्याला देत आहे. दमदार बॅटरी, 120Hz डिस्प्ले, 5G सपोर्ट, आणि खतरनाक प्रोसेसर यामुळे हा फोन रोजच्या वापरासाठी खूपच चांगला आहे. कॅमेरा आणि चार्जिंग स्पीडही या किंमतीच्या मानाने समाधानकारक आहे.