आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन घेणे ही फक्त लक्झरी नसून एक गरज बनलेली आहे. त्यामध्ये चांगले फीचर्स असलेले फोन जर कमी बजेटमध्ये भेटले, तर ते सोन्याहून पिवळं आस म्हणायला काय हरकत नाही. Samsung या कंपनीने आपला नवीन Galaxy M35 5G हा फोन लॉन्च केलेला आहे, हा फोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सच्या यादीत परफेक्ट बसत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण हा फोन बजेट फ्रेंडली आहे का याविषयी संपूर्ण माहिती घेऊ.
Samsung Galaxy M35 5G फोनची किंमत किती आहे
Samsung Galaxy M35 5G हा फोन सध्या भारतात 3 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, आणी या तिन्ही व्हेरिएंट्समधल्या किंमती खूपच कमालीच्या आहेत. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला बेसिक व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹14,300 रुपये आहे. थोडं जास्त RAM आणी स्टोरेज हवं असेल, तर 8GB RAM + 128GB स्टोरेज वाला व्हेरिएंट ₹16,999 रूपयाच्या आसपास आहेत. आणि जास्त स्टोरेज हवं असेल तर 8GB RAM + 256GB स्टोरेज वाला व्हेरिएंट ₹18,500 किंमतीमध्ये आहे.
Samsung Galaxy M35 5G Features
Feature | Details |
---|---|
Display | 6.6-inch Super AMOLED, Full HD+ (1080 x 2340 pixels), 120Hz refresh rate |
Processor | Exynos 1380 (5nm), Octa-core (4×2.4 GHz + 4×2.0 GHz) |
GPU | Mali-G68 MP5 |
Rear Camera | Triple: 50MP (Main) + 8MP (Ultra-wide) + 2MP (Macro) |
Front Camera | 13MP |
Battery | 6000mAh, 25W fast charging support |
Operating System | Android 14 with One UI |
5G Support | Yes, multiple bands supported in India |
RAM & Storage | 8GB RAM, 128GB internal storage, expandable via microSD (up to 1TB) |
Build Material | Plastic back, Gorilla Glass Victus+ front |
Water Resistance | IP67 certified (dust and water resistant) |
Security | Side-mounted fingerprint sensor, Face Unlock |
Other Features | Dual SIM, Vapour Cooling Chamber, Dolby Atmos support |
Dimensions | 8.4 mm thickness, ~208g weight |
Colors Available | Dark Blue, Light Blue, Grey |
Also Read This – Vivo T4x 5G हा स्मार्टफोन परवडणार आहे का: काय फीचर्स आहेत फोनमध्ये
Samsung Galaxy M35 5G Display
Samsung Galaxy M35 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.6 इंच Super AMOLED डिस्प्ले आहे, या डिस्प्लेच रिझोल्यूशन Full HD+ (1080 x 2340 पिक्सेल) आहे. फोनमध्ये रिफ्रेश रेट 120Hz आहे, गेम खेळणे आणि सोशल मिडिया ब्राउझिंगसाठी हा परफेक्ट डिस्प्ले आहे. 1000 निट्स (HBM) येवढी फोनची ब्राइटनेस आहे, त्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते.
Samsung Galaxy M35 5G Camera
Samsung Galaxy M35 5G या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, त्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणी 2MP मॅक्रो कॅमेरा असा हा सेटअप आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये OIS (Optical Image Stabilization) आणि Nightography आशेसुद्धा फीचर्स दिलेले आहेत. सेल्फीसाठी 13MP सेल्फी कॅमेरा आहे.
Samsung Galaxy M35 5G Battery
Samsung Galaxy M35 5G मध्ये आपल्याला 6000mAh लिथियम-आयन बॅटरी मिळणार आहे, कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन फक्त 30 मिनिटमध्ये फुल चार्ज होऊ शकतो. चार्जिंग करण्यासाठी USB Type-C पोर्टद्वारे 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, या चार्जरच्या मदतीने आपण खूपच कमी वेळामद्धे फोन चार्ज करू शकतो.
Samsung Galaxy M35 5G Processor
Samsung Galaxy M35 5G मध्ये Octa-core (4x 2.4 GHz Cortex-A78 + 4x 2.0 GHz Cortex-A55) हा प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर रोजच्या वापरासाठी मल्टीटास्किंग, आणि गेमिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये Vapour Cooling Chamber आहे, ज्यामुळे आपला फोन हा जास्त वेळ वापरला तरी गरम होण्याचा प्रॉब्लेम होणार नाही.
FAQ’s
Samsung Galaxy M35 5G फोनमध्ये मेमरी कार्ड स्लॉट आहे का ?
हो, Samsung Galaxy M35 5G मध्ये dedicated microSD कार्ड स्लॉट आहे. आपण एकाचवेळी 2 सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकतो.
Samsung Galaxy M35 5G हा फोन वॉटरप्रूफ आहे ?
Samsung Galaxy M35 5G ला IP67 रेटिंग आहे, म्हणजेच हा फोन थोड्या वेळासाठी पाण्यात पडला तरी खराब होणार नाही.
Samsung Galaxy M35 5G या फोनसोबत चार्जर मिळतो का ?
Samsung Galaxy M35 5G फोनसोबत बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाहीये, तुम्हाला गळा 25W Samsung फास्ट चार्जर खरेदी करावा लागेल.
Conclusion
एकूणच पाहता, Samsung Galaxy M35 5G हा फोन बजेटमध्ये खूपच चांगले फीचर्स देत आहे. दमदार बॅटरी, Super AMOLED डिस्प्ले, 5G सपोर्ट, आणि पावरफुल प्रोसेसर यामुळे हा फोन रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे.