आजच्या काळात जर आपल्याला स्मार्टफोन घेयचा असेल तर खूप गोष्टीवरती आपल्याला लक्ष द्यावे लागते, जशे की किंमत, फीचर्स, कॅमेरा, बॅटरी लाईफ आणि अर्थातच 5G सपोर्ट. अशा वेळी जर एखादा फोन कमी किंमतीमध्ये चांगले फीचर्स जर देत असेल तर खरचच आपल नशीब म्हणायला हरकत नाही. Realme P3x 5G हा असाच एक स्मार्टफोन आहे जो बजेट फ्रेंडली आहे. या लेखामध्ये आपण Realme P3x 5G चे फीचर्स, परफॉर्मन्स आणि हा फोन “व्हॅल्यू फॉर मनी” आहे का हे पाहणार आहे.
Realme P3x 5G हा बजेट फ्रेंडली आहे का
Realme P3x 5G हा स्मार्टफोन भारतात 18 फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च झालेला आहे. हा फोन मार्केटमध्ये 2 वेरिएंटसोबत उपलब्ध आहे. त्यामध्ये 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला फोन ₹13,999 रुपयेमध्ये मिळणार आहे आणी दूसरा 8GB RAM + 128GB स्टोरेज आसलेला फोन ₹14,999 मध्ये आहे. या किंमतीच्यानुसार Realme P3x 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आहे.
Realme P3x 5G Features
Feature | Specification |
---|---|
Display | 6.72-inch FHD+ IPS LCD, 120Hz Refresh Rate |
Processor | MediaTek Dimensity 6300 (aka Dimensity 6400 series) |
RAM Options | 6GB / 8GB LPDDR4X |
Storage | 128GB UFS 2.2 (Expandable via microSD) |
Rear Camera | 50MP Primary + 2MP Depth Sensor |
Front Camera | 8MP Selfie Camera |
Battery | 6000mAh |
Charging | 45W SuperVOOC Fast Charging |
Operating System | Android 13, Realme UI 4.0 |
5G Support | Yes, Dual 5G SIM Support |
Fingerprint Sensor | Side-mounted |
Design & Build | IP69 Rated, Military Grade Shock Resistant Body |
Colors Available | Meteor Black, Blazing Blue |
Weight | ~205 grams |
Price in India | ₹13,999 (6GB) / ₹14,999 (8GB) |
Also Read This – Samsung Galaxy M35 5G फोन बजेट फ्रेंडली लिस्टमध्ये आहे
Realme P3x 5G Display
Realme P3x 5G मध्ये आपल्याला 6.72 इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळणार आहे, या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल्स आहे. या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन्स आपल्याला खूपच स्मूथ दिसणार आहे. या डिस्प्लेला “ArmorShell” डिझाइन आहे, त्यामुळे हा फोन हातातून खाली पडला तरी डिस्प्लेला डॅमेज येणार नाही
Realme P3x 5G Battery
Realme P3x 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, ही बॅटरी इतर फोनपेक्षा थोडी जास्तच टिकणार आहे. या फोनची बॅटरी ही SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, यामुळे आपला फोन चार्ज होण्यासाठी जास्त टाईम लागत नाही. या बॅटरीच्या मदतीने आपण जास्त वेळ गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाचा वापर करू शकतो.
Realme P3x 5G Camera
Realme P3x 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सल्स आणी सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा असणार आहे. खर सांगायच तर हा फोन कॅमेराच्या बाबतीत खास नाहीये पन जर तुम्ही रोजच्या वापराठी हा फोन घेत असला तर या फोनचा कॅमेरा जेमतेम आहे.
Realme P3x 5G Processor
Realme P3x 5G मध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आहे, जो 6nm फॅब्रिकेशनवर आधारित आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2x Cortex-A76 (2.5GHz) आणि 6x Cortex-A55 (2.0GHz) कोरसोबत येतो, त्यामुळे आपला फोन मल्टीटास्किंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि कॅज्युअल गेमिंगसाठी खूपच स्मूथ चालतो.
FAQ’s
Realme P3x 5G मध्ये 5G सपोर्ट आहे का ?
हो, Realme P3x 5G मध्ये 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. तसेच, ज्या भागात 5G नेटवर्क उपलब्ध नसणार आहे त्याठिकाणी तो 4G नेटवर्कवरही खूपच फास्ट चालणार आहे.
Realme P3x 5G मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे का ?
हो, Realme P3x 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यामुळे फोन अनलॉक करणे खूपच सोप्पे आणी फास्ट होते.
Realme P3x 5G मध्ये स्टीरिओ स्पीकर्स आहेत का ?
नाही, Realme P3x 5G मध्ये स्टीरिओ स्पीकर्स नाहीत. हा फोन एक सिंगल स्पीकर सिस्टमसह येतो, पण त्याची साउंड क्वालिटी किंमतीच्या मानाने चांगली आहे.
Conclusion
Realme P3x 5G बद्दल सांगायच झाल तर हा फोन कमी किंमतीमध्ये आपल्याला खूपच चांगले फीचर्स देत आहे. 6000mAh ची मोठी बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले, MediaTek Dimensity 6400 सारखा 5G प्रोसेसर आणि 50MP चा कॅमेरा हे सर्व फक्त 15 हजारमध्ये मिळणं एक चांगली डील आहे.