Motorola Edge 60 Fusion Marathi Review: मोटोरोला या कंपनीने गेल्या 2 वर्षामध्ये भारतामध्ये कमी बजेटमध्ये प्रीमियम सेगमेंटचे भरपूर स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत. जर तुम्ही मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन घ्यायचे ठरवत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मोटोरोलाने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे हा Motorola Edge 60 Fusion हा स्मार्टफोन आहे. आजच्या आपण या बजेट स्मार्टफोन च्या सिरिजमध्ये या फोनविषयी संपूर्ण माहिती मिळवणार आहे.
Motorola edge 60 Fusion भारतात कधी लॉन्च होणार आहे
Motorola edge 60 Fusion हा फोन भारतात 2 April 2025 या तारखेला लॉन्च झालेला आहे. हा फोन भारतात 2 वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये 8GB RAM आणी 256GB स्टोरेज आणी 12GB RAM आणी 256GB स्टोरेज हे दोन ते वेरिएंट्स आहेत. या फोनची ऑनलाइन विक्री ही 9 एप्रिल पासून मोटोरोलाच्या ऑफीशीयल आणी त्याचसोबत फ्लिपकार्ट, Amazon या रिटेल स्टोर्सवरती चालू होणार आहे.
Motorola edge 60 Fusion किंमत काय आहे
Motorola edge 60 Fusion हा फोन आपण वरती पहिल्याप्रमाणे 2 वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे बेस वेरिएंट त्यामध्ये, 8GB RAM आणी 256GB स्टोरेज आहे याची किंमत जेमतेम ₹22,999 पासून सुरू होणार आहे आणी दूसरा वेरिएंट 12 GB RAM आणी 256GB स्टोरेजवाला स्मार्टफोन हा मार्केटमध्ये ₹24,999 ला उपलब्ध आहे. ह्या किंमती ऑनलाइन प्लेटफॉर्म्स जसे की फ्लिपकार्ट आणी विविध वेबसाइटवर वेगवेगळ्या असू शकत्यात.
Motorola edge 60 Fusion Feature in Marathi
Motorola edge 60 Fusion हा फोन एक खूपच चांगला शानदार मिड-रेंज स्मार्टफोन आहे जो की खुपच आधुनिक आणी प्रभावशाली फीचर्ससोबत आपल्याला पहायला मिळणार आहे. खाली आपण या स्मार्टफोनच्या काही प्रमुख फीचर्सबाबत मराठीमध्ये सविस्तर माहिती मिळवणार आहे.
Motorola Edge 60 Fusion Display Marathi
Motorola Edge 60 Fusion हा फोन Quad-Curved AMOLED डिस्प्लेसोबत येणार आहे, याचा अर्थ असा आहे की या फोनची स्क्रीन चारी बाजूंनी थोडीशी गोलाकार असणार आहे. त्यामुळे हा फोन दिसायला खूपच आकर्षक दिसतो आणी हातातसुद्धा घट्ट बसतो. रिज़ॉल्यूशन 1.5K 1220×2712 पिक्सल आहे त्यामुळे इमेज, विडियो आणी गेम हे खूपच चमकदार दिसणार आहे. 120Hz रिफ्रेश रेट सोबत हा फोन मार्केटमध्ये पहायला मिळणार आहे. फोनची ब्राइटनेस ही 4500 निट्स असणार आहे, त्यामुळे खूप उन्हातसुद्धा स्क्रीन साफ दिसणार.
Motorola Edge 60 Fusion Battery Marathi
Motorola Edge 60 Fusion या फोनची Battery 5500mAh ची खूपच मोठी बॅटरी असणार आहे. जी एकदा चार्ज केली तर पूर्ण दिवसभर चालणार आहे, विशिष्ट म्हणजे दिवसभरसुद्धा गेम, विडिओ पाहिला तरपण बॅटरी गरम होणार नाही हा प्रॉब्लेम आपल्याला मोटोच्या या आधीच्या फोनमध्ये पहायला मिळालेला होता. फोनला चार्ज करण्यासाठी 68W टर्बो चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. कंपनीचा दावा आहे की 10-12 मिनिटमध्ये चार्जिंग फुल होऊ शकते. या फोनला चार्जर वेगळा घ्यायची गरज नाही कारण चार्जर हा तुम्हाला बॉक्समधेच भेटणार आहे.
Motorola Edge 60 Fusion Camera Marathi
Motorola Edge 60 Fusion फोन मै मुख्य कॅमेरा ट्रिपल कैमरा सेटअपसोबत पहायला मिळणार आहे. प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सल चा Sony LYT700C सेंसर कॅमेरा आहे, यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइज़ेशन (OIS) आहे. या कॅमेरामध्ये कमी रोशनीमध्ये पण साफ फोटो आणी विडियो हा स्थिर येणार आहे. दुसरी 13 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आहे ती ग्रुप फोटो किव्हा मोठे नजारे क्लिक करण्यासाठी उत्तम आहे आणी ही लेन्स मैक्रो शॉट्ससाठीसुद्धा खूपच कमालीची आहे. तिसरा कॅमेरा हा 3-इन-1 लाइट सेंसर आहे, तो ऊजेड समजून फोटोमधील रंग आणी चमकला व्यवस्थित करण्याचं काम करणार आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा हा 32 मेगापिक्सलचा असणार आहे.
Motorola Edge 60 Fusion Processor Marathi
या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400 प्रोसेसर असणार आहे, हा प्रोसेसर 4nm टेक्नोलॉजीवर बनलेला आहे. हा प्रोसेसर खूपच फास्ट आहे आणी त्याचबरोबर कमी वीज खाणार आहे. जर तुम्ही गेम किवहा विडियो पाहत असाल तरी हा प्रोसेसर हैंग नाही होणार. PUBG आणी BGMI या सारख्या हेवी गेम्ससुद्धा खूपच स्मूथ चालणार आहेत. म्हणूनच कमी प्राइसमध्ये जरी हा फोन आपल्याला मिळत असेल तरी प्रोसेसर हा खूपच लेटेस्ट टेक्नॉलजीवर आधारित आपल्याला पाहायला मिळणार आहे.
FAQ’s
Motorola Edge 60 Fusion हा 5G फोन आहे का ?
हो, Motorola Edge 60 Fusion हा खरंच 5G फोन आहे! यात तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळते, त्यामुळे इंटरनेट स्पीड हे खूपच वेगवान आहे आणि नेटवर्क परफॉर्मन्स पण चांगला आहे. मीडियाटेक डाइमेन्सिटी 7 सीरीज प्रोसेसरमुळे गेमिंग, स्ट्रीमिंग सगळं खूपच सरल आणि सोप्पं झालेल आहे म्हणूनच, जर तुम्ही एक दमदार 5G फोन शोधत असाल, तर Motorola Edge 60 Fusion हा एक पर्याय असू शकतो.
Motorola Edge 60 Fusion हा फोन वॉटरप्रूफ आहे का ?
हो, Motorola Edge 60 Fusion हा वॉटरप्रूफ फोन आहे! त्याला IP68 रेटिंग मिळाली आहे, म्हणजेच थोडंसं पाणी किंवा धूळ यामुळे काही फरक पडनार नाही. पावसात फोन जरी भिजला तरी चिंता करण्याची काहीच गरज नाही, आणि चुकून पाण्यात पडला तरीसुद्धा फोन सुरक्षित असणार आहे.
Motorola Edge 60 Fusion Software Update
Motorola Edge 60 Fusion ला अपडेट्स चांगले दिलेले आहेत. या फोनला २ वर्ष Android अपडेट्स आणि ३ वर्ष सिक्युरिटी अपडेट्स आहेत, म्हणजेच पुढची काही वर्षे फोन अपडेट राहणार आहे.
Conclusion
आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये वरती “Motorola Edge 60 Fusion” या फोनविषयी संपूर्ण माहिती ही मराठीमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला मी दिलेली माही आवडली असेल तर तुम्ही मला कमेन्ट करून कळवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही माझी मदत हवी असेल तर तुम्ही मला Contact करून कळवू शकता. आम्ही अशाच मजेदार टेक विषयावर माहिती ही देत असतो तर चला मित्रांनो आपण पुन्हा नक्की भेटू.