आजकाल जर स्मार्टफोन घेयचा असेल तर फक्त कॅमेराच नाही बॅटरी भगीतली जात नाही, तर त्या फोनमध्ये चांगली गेमिंग करता येणार का हे सुद्धा पाहिले जाते. iQOO ही ब्रँड गेल्या काही वर्षापासून गेमिंगसाठी एक उत्तम स्मार्टफोन मानला गेला आहे. फोनमध्ये आलेल्या नवीन अपडेटनंतर हा फोन युजर्सनाआणखी चांगला वाटू लागला आहे. पन खरचच हा फोन गेमिंगसाठी योग्य आहे का, तर आजच्या या लेखामध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती मिळवणार आहे.
iQOO Z9x स्मार्टफोनची किंमत किती आहे
iQOO Z9x हा स्मार्टफोन भारतात तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज असलेला फोन ₹12,999 किंमतीला आहे, 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला दूसरा फोन ₹14,499 मध्ये आहे आणी शेवटचा 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेला फोन ₹15,999 मध्ये आहे.
iQOO Z9x Features in Marathi
Feature | Details |
---|---|
Display | 6.72-inch FHD+ LCD, 120Hz Refresh Rate |
Processor | Qualcomm Snapdragon 6 Gen 1 (6nm) |
GPU | Adreno GPU |
RAM & Storage | 4GB/6GB/8GB RAM, 128GB Storage |
Rear Camera | Dual: 50MP (Main) + 2MP (Depth) |
Front Camera | 8MP Selfie Camera |
Battery | 6000mAh Massive Battery |
Charging | 44W Fast Charging (Type-C) |
Operating System | Android 14 with Funtouch OS 14 |
5G Support | Yes |
Build Quality | Plastic Back with IP64 Dust & Splash Proof |
Audio | Mono Speaker, 3.5mm Headphone Jack |
Fingerprint Sensor | Side-mounted |
Expandable Storage | Yes (Dedicated microSD slot) |
Weight | ~199 grams |
Colors | Tornado Green, Storm Grey (varies) |
Also Read This – Realme P3x 5G हा बजेट फ्रेंडली आहे का
iQOO Z9x Display in Marathi
iQOO Z9x या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचांचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा आहे. या फोनएचया डिस्प्लेचे रिझोल्यूशन (2400 x 1080 pixels) आहे. फोनमध्ये 1000 nits ब्राइटनेस देण्यात आलेली आहे. यामुळे उन्हातसुद्धा स्क्रीन व्यवस्थित दिसणार आहे.
iQOO Z9x Camera in Marathi
iQOO Z9x मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आपल्याला देण्यात आलेला आहे, हा कॅमेरा सेटअप रोजच्या फोटोग्राफीसाठी योग्य आहे. त्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणी 2MP डेप्थ सेन्सर शामिल आहे. फ्रंट कॅमेराबद्दल सांगायच तर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे, त्यासोबतच या कॅमेरामध्ये AI ब्यूटी मोडसुद्धा आहे.
iQOO Z9x Battery in Marathi
iQOO Z9x मध्ये आपल्याला 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 1.5 ते 2 दिवस सहज वापरता येणार आहे. फोन लवकर चार्ज करण्यासाठी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, कंपनीच्या मते, 0% ते 50% चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिट वेळ लागतो.
iQOO Z9x Processor in Marathi
iQOO Z9x मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 (6nm architecture) हा नवीन आणि पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे. हा प्रोसेसर मुख्यता मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी बनवलेला आहे. iQOO Z9x या स्मार्टफोनचा Antutu स्कोर 560,000+ आहे. त्यासोबतच प्रोसेसरमध्ये Advanced Cooling System पन देण्यात आलेली आहे.
FAQ’s
iQOO Z9x वॉटरप्रूफ आहे का ?
iQOO Z9x हा स्मार्टफोन पूर्णपणे वॉटरप्रूफ नाही, पण यामध्ये IP64 रेटिंग आहे. याचा अर्थ हा फोन डस्टप्रूफ आणि स्प्लॅश-रेझिस्टंट आहे. म्हणजेच थोड्याफार पाण्यामध्ये फोन सुरक्षित राहू शकतो पन जास्त वेळ हा फोन चालेल याची काही माहिती नाही.
iQOO Z9x मध्ये 5G सपोर्ट आहे का ?
हा, iQOO Z9x हा 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. यामध्ये भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख 5G बँड्सचा सपोर्ट आहे. त्यामुळे जिथे 5G नेटवर्क उपलब्ध असेल, तिथे आपण 5G इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकतो.
iQOO Z9x हा गेमिंगसाठी योग्य फोन आहे का ?
हा, iQOO Z9x हा गेमिंगसाठी चांगला स्मार्टफोन आहे, यात Snapdragon 6 Gen 1 हा प्रोसेसर आहे, जो गेम्ससाठी जबरदस्त आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे, त्यामुळे गेमिंग स्मूथ होणार आहे.
Conclusion
iQOO Z9x हा स्मार्टफोन त्याच्या किंमतीच्या मानाने आपल्याला खरोखरच दमदार फीचर्स देत आहे. 120Hz डिस्प्ले, शक्तिशाली Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग या सगळ्या फीचर्समुळे हा फोन रोजच्या वापरासाठी आणि गेमिंगसाठी खूपच चांगला आहे. पन लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त गेमिंगसाठी हा फोन घेत असाल तर हा फोन खूपच चांगला आहे, कॅमेराच्या बाबतीत जास्त फीचर्स या फोनमध्ये उपलब्ध नाहीयेत.