CMF Phone 1 हा फोन घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील

स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येकवर्षी नवीन आलेले ब्रॅंडस आपली जागा निर्माण करण्याच काम करतात. CMF या नवीन स्मार्टफोन कंपनीने “CMF Phone 1” हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स देण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये सादर करण्यात आलेला आहे. तर आजच्या या लेखामध्ये आपण या फोनविषयी संपूर्ण माहिती मिळवणार आहे.

CMF Phone 1 हा फोन घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील

CMF Phone 1 हा स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ₹15,999 आहे तर 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ₹17,999 रुपये आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर तुम्ही हा फोन बँक ऑफर्समध्ये घेतला तर फोनच्या किंमतीत आणखी सवलत मिळू शकते. CMF Phone 1 हा फोन घेण्यासाठी आपल्याला 15000 ते 16000 पैसे मोजावे लागतील.

CMF Phone 1 Features in Marathi

वैशिष्ट्य (Feature)माहिती (Details)
डिस्प्ले6.67 इंच Full HD+ सुपर AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट
प्रोसेसरMediaTek Dimensity 7300 5G
मागचा कॅमेरा50MP मुख्य सेन्सर + 2MP पोर्ट्रेट सेन्सर
सेल्फी कॅमेरा16MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी5000mAh बॅटरी
स्टोरेज6GB/8GB RAM + 128GB स्टोरेज
नेटवर्क5G, 4G, 3G, 2G सपोर्ट
ऑपरेटिंग सिस्टमAndroid 14 आधारित CMF OS
IP रेटिंगIP52
रंग पर्यायऑरेंज, ब्लॅक, ब्लू
विशेष फिचरमॉड्युलर बॅक कव्हर सपोर्ट

Also Read This – Moto G64 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडलीच्या लिस्टमध्ये आहे

CMF Phone 1 डिस्प्ले माहिती मराठीमध्ये

CMF Phone 1 फोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा Super AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला Full HD+ (2400 x 1080 पिक्सेल्स) रिझोल्यूशन आहे, त्यासोबतच 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे गेमिंग आणि स्क्रोलिंग करताना स्क्रीनचा खूपच स्मूथ अनुभव आपल्याला मिळणार आहे. डिस्प्लेमध्ये जास्तीत जास्त 2000 निट्स ब्राइटनेस देण्यात आलेली आहे, त्यामुळे उन्हात सुद्धा स्क्रीन स्पष्ट दिसणार आहे.

CMF Phone 1 बॅटरी माहिती मराठीमध्ये

CMF Phone 1 फोनमध्ये 5000mAh क्षमता असलेली बॅटरी दिलेली आहे, जर आपण फोन पूर्ण चार्ज केला तर दिवसभर फोनमध्ये गेम्स, सोशयल मीडिया वापरू शकतो. बॅटरी चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग देण्यात आलेला आहे, याच्या मदतीने आपण फक्त काही मिनिटांत मोबाईल फुल चार्ज करू शकतो.

CMF Phone 1 कॅमेरा माहिती मराठीमध्ये

CMF Phone 1 मध्ये ड्युल कॅमेरा सेटअप दिलेला आहे, त्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा दिलेलाआहे. या कॅमेराच्या मदतीने आपण हाय-रेझोल्यूशन फोटोग्राफी करू शकतो. तर या फोनमध्ये दूसरा 2MP पोर्ट्रेट सेन्सर आहे, या कॅमेरामुळे आपण खुपच सुंदर पद्धतीने फोटोवरती फोकस करू शकतो. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. याशिवाय फोनच्या कॅमेरामध्ये पोर्ट्रेट मोड, ब्यूटी मोड आणि AI बेस्ड सुधारणा आशे काही फीचर्स दिलेले आहेत.

CMF Phone 1 प्रोसेसर माहिती मराठीमध्ये

CMF Phone 1 मध्ये MediaTek Dimensity 7300 5G हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे, तर हा प्रोसेसर 4nm टेक्नॉलॉजीवरती काम करतो. हा प्रोसेसर मल्टीटास्किंग, गेमिंग आणि एकसोबत अनेक अ‍ॅप्स चालण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्यासोबतच या फोनमध्ये GPU (Graphics Processing Unit) हे Mali-G615 दिलेले आहे, त्यामुळे गेम्स आणि ग्राफिक्स खूपच चांगले दिसते.

FAQ’s

CMF Phone 1 मध्ये 5G सपोर्ट आहे का ?

हो, CMF Phone 1 मध्ये 5G सपोर्ट दिला आहे. त्यामुळे भविष्यात भारतात प्रत्येक शहरात 5G सेवा उपलब्ध झाल्यावर आपल्याला फास्ट इंटरनेट वापरता येणार आहे.

CMF Phone 1 मध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टम आहे ?

CMF Phone 1 हा फोन Android 14 वर आधारित कस्टम CMF OS वर चालतो. यामध्ये आपल्याला बरेच स्टमायझेशनचे ऑप्शन मिळणार आहेत.

CMF Phone 1 मध्ये कोणते कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत ?

CMF Phone 1 मध्ये सध्या भारतात ऑरेंज, ब्लॅक, आणि ब्लू आशे तीन आकर्षक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा आवडता कलर निवडून त्याचा प्रीमियम अनुभव मिळवू शकता.

Conclusion

CMF Phone 1 हा फोन चांगल्या डिझाइन, फीचर्स आणि कमी किंमतीमुळे भारतीय बाजारात एक चांगला पर्याय ठरलेला आहे. जर तुम्ही 15,000 ते 18,000 रुपयांच्या दरम्यान एक चांगला स्टायलिश स्मार्टफोन शोधत असाल, तर CMF Phone 1 हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment