Vivo T4 5G कधी होणार आहे भारतात लॉन्च: काय असणार आहेत नवीन फीचर्स

भारतात 5G स्मार्टफोनचा बाजार रोज दिवसेंदिवस खूपच जोरात वाढलेला आहे, आणी त्याचबरोबर Vivo कंपनी देखील आपला नवा Vivo T4 5G स्मार्टफोन घेऊन येत आहे. खूप साऱ्या अफवा आणि लीकनंतर, शेवटी Vivo T4 5G कधी लॉन्च होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला काही नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत, आजच्या या लेखामध्ये आपण हा फोन कधी लॉन्च होणार आणी काय नवीन फीचर्स मिळतील याबद्दल सविस्तर माहिती मिळवणार आहे.

Vivo T4 5G कधी होणार आहे भारतात लॉन्च

Vivo T4 5G भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, Vivo हा फोन एप्रिल 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. आजुन कंपनीकडून लॉन्च डेट जाहीर झालेली नाहीये, पण टीझर्स आणि प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू झाल्या आहेत, त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो.

Vivo T4 5G किंमत किती आहे

कंपनीकडून या स्मार्टफोनची किंमत आत्तापर्यन्त ऑफीशीयल सांगण्यात आलेली नाहीये, पण लिक्स आणी काही रीपोर्टनुसार या स्मार्टफोनची किंमत साधारणपणे ₹15,000 ते ₹18,000 दरम्यान असू शकते. Vivo T4 5G हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमधला एक दमदार फोन असल्यामुळे, हा सर्वांच्या खिशाला परवडणाराआहे.

Vivo T4 5G Features in Marathi

FeatureDetails
Display6.72-inch Full HD+ IPS LCD, 120Hz refresh rate
ProcessorQualcomm Snapdragon 695 5G
Rear Camera50MP Main Camera + 2MP Depth Sensor
Front Camera16MP Selfie Camera
Battery5000mAh with 44W Fast Charging
Operating SystemFuntouch OS (based on Android 14)
Connectivity5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.1
Storage & RAMExpected 6GB/8GB RAM with 128GB Storage
SecuritySide-mounted fingerprint sensor
BuildSleek design, plastic back and frame
Expected Price₹15,000 to ₹18,000
Launch DateEnd of April or Early May 2025

Also Read This – Motorola Edge 60 Stylus कधी येणार आहे

Vivo T4 5G Display

Vivo T4 5G मध्ये एक मोठा आणि आकर्षक 6.72-इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले IPS LCD पॅनलसोबत येणार आहे, त्यामुळे रंग जास्त ओरिजनल आणी डीटेलमध्ये दिसणार आहे. या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना स्क्रीन अगदी स्मूथ चालणार आहे.

Vivo T4 5G Camera

Vivo T4 5G कॅमेऱ्याच्या बाबतीत यूजरला निराश करणार नाही. फोनमध्ये आपल्याला ड्युल कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे, त्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा जो दिवसा आणी रात्री, चांगले फोटो क्लिक करायला मदत करतो. त्यासोबत 2MP चा डेप्थ सेन्सर असेल, जो पोर्ट्रेट फोटो काढताना background ला हलका (blur) करून फोटोला प्रोफेशनल लुक देण्यात मदत करेन. सेल्फी प्रेमींसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण सुंदर सेल्फीज आणि स्पष्ट व्हिडिओ कॉल्स करू शकतो.

Vivo T4 5G Battery

बॅटरी हा स्मार्टफोनचा पहिल्यापासून महत्वाचा भाग राहीला आहे, Vivo T4 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर आपण दिवसभर आरामात फोन वापरू शकतो, त्यामध्ये जरी आपण सोशल मीडिया वापरल असो, गेमिंग, किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग केली तरी बॅटरी जास्त कमी होणार नाही. याशिवाय, फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच भरपूर चार्ज होणार आहे.

Vivo T4 5G Processor

Vivo T4 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर असणार आहे. हा प्रोसेसर मिड-रेंज फोनसाठी एकदम परफेक्ट मानला गेला आहे. आपण जर गेम खेळत आसलो, एकावेळी भरपूर अ‍ॅप्स चालवत असलो किंवा ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीम करत असेल, तरी हा प्रोसेसर स्मूथ आणि फास्ट चालणार आहे.

FAQ’s

Vivo T4 5G मध्ये वायरलेस चार्जिंग आहे का ?

नाही, Vivo T4 5G मध्ये आपल्याला वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार नाही. पण 44W फास्ट वायर्ड चार्जिंगआहे, जो या किंमतीमध्ये फार चांगला ऑप्शन आहे. काही मिनिटांत फोन चार्ज होतो, त्यामुळे वायरलेस चार्जिंगची गरज लागणार नाही.

Vivo T4 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आहे का ?

नाही, Vivo T4 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो फोनच्या पॉवर बटणातच दिलेला आहे.

Vivo T4 5G मध्ये Android अपडेट्स किती वर्षासाठी मिळणार आहेत ?

Vivo T4 5G मध्ये कमीत कमी 2 वर्षांचे मेजर Android अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत.

Conclusion

वरती माहिती घेतल्याप्रमाणे Vivo T4 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आहे, Vivo T4 5G हा फोन त्याच्या किमतीच्या मानाने आपल्याला खतरनाक फीचर्स देत आहे. 120Hz चा स्मूथ डिस्प्ले, दमदार Snapdragon 695 प्रोसेसर, आणि 5000mAh ची मोठी बॅटरी यामुळे हा स्मार्टफोन रोजच्या वापरासाठी त्याचसोबत गेमिंगसाठी खूपच चांगला ठरणार आहे. माझा सल्ला असा आहे की जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्की हा फोन घेऊ शकता.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment